JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / व्हॉट्सऍपवर स्वत:लाच श्रद्धांजली वाहून तरुणाची आत्महत्या

व्हॉट्सऍपवर स्वत:लाच श्रद्धांजली वाहून तरुणाची आत्महत्या

27 नोव्हेंबर : व्हॉट्सऍपवर कधी काय शेअर होईल याला नेम नाही आणि याची सवय आता सर्वांनाच झालीये. पण एका तरुणाने आपल्याच फोटोवर भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली. महादेव कुंभार (22) असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचा रहिवासी महादेव कुंभार या 22 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. पण त्याने आत्महत्या करण्याअगोदर व्हॉट्सऍप ‘कै.महादेव कुभांर भावपूर्ण श्रद्धांजली’ असा मजकुराचा फोटो टाकला आणि मित्रांना,ग्रुपवर शेअर केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

whatsapp_342 27 नोव्हेंबर : व्हॉट्सऍपवर कधी काय शेअर होईल याला नेम नाही आणि याची सवय आता सर्वांनाच झालीये. पण एका तरुणाने आपल्याच फोटोवर भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली. महादेव कुंभार (22) असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचा रहिवासी महादेव कुंभार या 22 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. पण त्याने आत्महत्या करण्याअगोदर व्हॉट्सऍप ‘कै.महादेव कुभांर भावपूर्ण श्रद्धांजली’ असा मजकुराचा फोटो टाकला आणि मित्रांना,ग्रुपवर शेअर केला. सुरुवातील त्याने मस्करी केली असावी म्हणून कुणी लक्ष दिलं नाही. मात्र त्यानंतर आई वडील घराबाहेर पडल्यानंतर घरीच गळफास लावून त्यानं आत्महत्या केली. हा प्रकार लक्ष्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. महादेव अशी चेष्टा करेल अशी कुणालाच जाणीव नव्हती. महादेवच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. महादेव हा एका कारखान्यात कंत्राटी कामगार म्हणून काम करायचा आणि त्यावर शिक्षण घेत होता. त्याच्या आत्महत्येमुळे वाळवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पण त्याने आत्महत्या का केली हे मात्र अजून कळू शकले नाही. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या