22 डिसेंबर
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या साहित्यिकाला महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा पहिला विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असं आहे. गेल्या वर्षीच्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांच्या नावे हा पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येईल असे ही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.