JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / डॉ. कलाम यांचा अल्पपरिचय

डॉ. कलाम यांचा अल्पपरिचय

27 जुलै : मनाने अतिशय संवेदनशील, अतिशय नम्र, प्रेमळ, साधे आणि सरळ असा अब्दुल कलामांचा स्वभाव… विज्ञानाची जशी आवड तशीच वीणा वाजण्याची, कविता करण्याचीही त्यांना आवड होती. मुलांमध्ये तर ते फारच रमायचे. राष्ट्रपती असताना त्यांनी राष्ट्रपती भवनाची द्वारं लहान मुलांसाठी खुली केली. कलाम कुराण आणि गीता दोन्हीला समान मानायचे. म्हणूनच आज सर्व धर्म,जाती संप्रदयातील लोकांना ते आपलेसे वाटतात. धर्म केवळ साधन आहे, अंतिम सत्याकडे जाण्याचा तो एक पूल आहे, अंतिम साध्य नव्हे, असं ते नेहमी म्हणायचे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
abdul kamal ar

27 जुलै : मनाने अतिशय संवेदनशील, अतिशय नम्र, प्रेमळ, साधे आणि सरळ असा अब्दुल कलामांचा स्वभाव… विज्ञानाची जशी आवड तशीच वीणा वाजण्याची, कविता करण्याचीही त्यांना आवड होती. मुलांमध्ये तर ते फारच रमायचे. राष्ट्रपती असताना त्यांनी राष्ट्रपती भवनाची द्वारं लहान मुलांसाठी खुली केली. कलाम कुराण आणि गीता दोन्हीला समान मानायचे. म्हणूनच आज सर्व धर्म,जाती संप्रदयातील लोकांना ते आपलेसे वाटतात. धर्म केवळ साधन आहे, अंतिम सत्याकडे जाण्याचा तो एक पूल आहे, अंतिम साध्य नव्हे, असं ते नेहमी म्हणायचे. 2002-2007 या काळात त्यांनी भारताचं राष्ट्रपतीपद भूषवलं. मिसाईल मॅन म्हणून जगभरात त्यांची ख्याती होती. पंतप्रधानांचे सल्लागार म्हणूनही त्यांची कारकीर्द फारच प्रभावी ठरली. सुरक्षाविषयक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी केली. 1999 मध्ये भारताने घेतलेल्या अणुचाचण्यांमध्ये अब्दुल कलाम यांचा सिंहाचा वाटा होता. ‘इंडिया 2020’ या पुस्तकातून भारत सुपरपॉवर बनेल हे भाकित त्यांनी वर्तवलं होतं.

एक नजर टाकूया त्यांच्या कारकिर्दीवर… - 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधल्या रामेश्वरम या ठिकाणी जन्म - जैनुलाबुद्दीन आणि आशियाम्मा यांच्या पोटी घेतला जन्म - जैनुलाबुद्दीन हे मासेमारीच्या व्यवसायात करत होते - 1960मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एअरोनॉटिकल इंजीनियरिंगची पदवी घेतली - डीआरडीओच्या एअरोनॉटीकल डेव्हलपमेंटमध्ये कामाला सुरुवात - सॅटेलाईट लाँच व्हेईकल थ्री या भारताच्या पहिल्या स्वदेशी रॉकेट प्रक्षेपकाच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं - जुलै 1980मध्ये एसएलव्ही-थ्री या रॉकेट प्रक्षेपकातून रोहिणी उपग्रहाचं पृथ्वीच्या कक्षेजवळ यशस्वीपणे प्रक्षेपण - यानंतर भारताला आंतरराष्ट्रीय अंतराळ गटामध्ये स्थान मिळालं - इस्रोच्या पीएसएलव्ही या प्रक्षेपकांच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान - इस्रोमध्ये 2 दशकं काम केल्यानंतर डीआरडीओच्या स्वदेशी बनावटीच्या गाईडेड मिसाईलच्या विकासाची जबाबदारी हाती घेतली - अग्नी आणि पृथ्वी या क्षेपणास्त्रांचा विकास आणि कार्यान्वित करणं ही त्यांची प्रमुख जबाबदारी होती - भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये ही दोन्ही क्षेपणास्त्रं अतिशय महत्त्वाची मानली जातात

संबंधित बातम्या

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या