JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / राज्य सरकार करणार सचिनचा भव्य सत्कार

राज्य सरकार करणार सचिनचा भव्य सत्कार

14 नोव्हेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या 200 व्या कसोटीला आता सुरूवात झाली आहे. क्रिकेटमध्ये सचिनने दिलेल्या योगदानाबद्दल सचिन भव्य सन्मान करण्याचं क्रीडा विभागाने ठरवलं आहे. क्रीडा विभागानं पुढच्या पंधरा दिवसात सचिनचा भव्य सत्कार सोहळा करण्याचं ठरवलंय. सचिन तेंडुलकरचा सत्कार करण्यासाठी एका समितीही बनवण्यात आलीये. या समितीचे प्रमुख क्रीडामंत्री पद्माकर वळवी असतील. मुंबई किंवा पुण्याच्या स्पोर्ट्स क्लबमधे सचिनच्या सत्काराचा सोहळा करण्यासाठी चाचपणीही करण्यात आलीय. सचिनचे फोटो असलेले मोमेन्टो बनवण्याचं काम सुरु झालंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

sachin tendulkar 14 नोव्हेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या 200 व्या कसोटीला आता सुरूवात झाली आहे. क्रिकेटमध्ये सचिनने दिलेल्या योगदानाबद्दल सचिन भव्य सन्मान करण्याचं क्रीडा विभागाने ठरवलं आहे.

क्रीडा विभागानं पुढच्या पंधरा दिवसात सचिनचा भव्य सत्कार सोहळा करण्याचं ठरवलंय. सचिन तेंडुलकरचा सत्कार करण्यासाठी एका समितीही बनवण्यात आलीये. या समितीचे प्रमुख क्रीडामंत्री पद्माकर वळवी असतील. मुंबई किंवा पुण्याच्या स्पोर्ट्स क्लबमधे सचिनच्या सत्काराचा सोहळा करण्यासाठी चाचपणीही करण्यात आलीय.

सचिनचे फोटो असलेले मोमेन्टो बनवण्याचं काम सुरु झालंय. टेस्ट मॅच संपल्यानंतर हा सत्कार सोहळा होणार आहे. मुंबई क्रिकेट क्लबप्रमाणेचं हा सोहळाही भव्यदिव्य असावा यासाठी सत्कार समिती कामाला लागली आहे. या कार्यक्रमाला राज्याचे सर्व मंत्रिमंडळ, देशातील अनेक मान्यवर खेळाडू, क्रिकेट जगतातले तज्ञ आमंत्रित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सचिनच्या कायम स्मरणात राहील अशी भेटही राज्यसरकराच्या क्रीडा विभागाकडून देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या