JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'राज'नीती, गोपीनाथ मुंडेंना मनसेचा पाठिंबा

'राज'नीती, गोपीनाथ मुंडेंना मनसेचा पाठिंबा

15 एप्रिल : ठाकरे बंधूंच्या ‘टाळी’साठी सदैव प्रयत्न करण्यात आघाडीवर असणारे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंब्याची ‘टाळी’ दिलीय. गोपीनाथ मुंडेंवर सातत्यानं टीका करणारे राज ठाकरेंनी आता बीडमध्ये मुंडेंना पाठिंबा जाहीर केलाय. गोपीनाथ मुंडे यांनी फोन करून आपल्या पाठिंबा मागितला. त्यामुळे फक्त बीडमध्येच आम्ही मुंडेंना पाठिंबा दिला असल्याचं राज ठाकरे यांनी जोगेश्वरी इथं झालेल्या सभेत स्पष्ट केलं. गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

raj_munde 15 एप्रिल : ठाकरे बंधूंच्या ‘टाळी’साठी सदैव प्रयत्न करण्यात आघाडीवर असणारे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंब्याची ‘टाळी’ दिलीय. गोपीनाथ मुंडेंवर सातत्यानं टीका करणारे राज ठाकरेंनी आता बीडमध्ये मुंडेंना पाठिंबा जाहीर केलाय.

गोपीनाथ मुंडे यांनी फोन करून आपल्या पाठिंबा मागितला. त्यामुळे फक्त बीडमध्येच आम्ही मुंडेंना पाठिंबा दिला असल्याचं राज ठाकरे यांनी जोगेश्वरी इथं झालेल्या सभेत स्पष्ट केलं. गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. मनसेनं या अगोदरच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलाय.

विशेष म्हणजे मध्यंतरी राज आणि नितीन गडकरी यांच्या भेटीमुळे महायुतीत चांगलाच तणाव निर्माण झाला होता. पण या भेटीमागे मुंडे-गडकरी गटाचा वाद असल्याची चर्चा सुरू होती. एवढंच नाही तर या भेटीनंतर मुंडे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर भरपूर आरोप-प्रत्यारोप केले होते. पण आता मनसे-शिवसेना यांच्यातल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मनसेनं मुंडे यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे याला महत्त्व प्राप्त झालंय.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या