प्रफुल्ल साळुंखे, मुंबई
16 एप्रिल : मुंबईतला प्रचार शेवटच्या टप्प्यात असतानाही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांची गर्दी ओसरलीय. मनसेच्या काही उमेदवारांचा प्रचारामधला रस संपल्याचंही चित्र आहे. पण मनसेमुळे मंुबईत मतविभागणी होणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मनसे शिवसेनेच्या किती जागा पाडेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. लाखांची सभा जिंकणार्या राज ठाकरेंच्या सभांची ही तुरळक गर्दी सगळं काही सांगतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सौम्य झालेली टीका, टोलचा गायब झालेला प्रश्न, मोदींच्या विकासाचा जयघोष यापलीकडे राज यांचं भाषण गेलंच नाही. नायगाव, गिरगाव, जोगेश्वरी या मराठी पट्यामध्येच राज यांच्या सभांना अपेक्षेपेक्षाही कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या सभा उशिराने सुरू कराव्या लागल्या. एवढंच नाही तर 30 सभा घेण्याचं जाहीर केलेल्या मनसेला अनेक सभा रद्द कराव्या लागल्यात. मनसेचे किती उमेदवार निवडून येतील याबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांनाच साशंकता आहे. पण शिवसेना आणि मनसेत झालेल्या मतविभागणीचा काँग्रेसलाच फायदा होणार असं अनेकांना वाटतंय. मनसेमुळे शिवसेनेच्या दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ठाणे आणि कल्याण या मतदार संघात मतविभागणी अटळ ठरलीय. मनसेच्या या मतविभागणीतून सेना सावरेल का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++