18 नोव्हेंबर : रसायनशास्त्र डॉ.सी.एन.आर. राव यांना शनिवारी भारतरत्न जाहीर झाला. सन्मान जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले.
मूर्ख राजकारणी वैज्ञानिक संशोधनाकडे दुर्लक्ष करत असुन, संशोधनासाठी अधिक साधनसंपत्तीची तातडीची गरज आहे. पण, राजकारणी ते पुरवत नाही असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
विशेष म्हणजे राव हे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार आहेत. संशोधनासाठी अधिक साधनसंपत्तीची तातडीची गरज आहे. पण, राजकारणी ते पुरवत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. वैज्ञानिक प्रगतीत भारत चीनच्या मागे पडण्यासाठी भारत सरकारच जबाबदार असल्याचंही ते म्हणाले.