JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'साठी दौड

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'साठी दौड

15 डिसेंबर : गुजरातच्या बडोदामध्ये आज रविवारी नरेंद्र मोदी यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी ‘रन फॉर युनिटी’ ही भव्य रॅली आयोजित केली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संबंधित बातम्या {{display_headline}} गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी बडोदा येथे या भव्य रॅलीचे उद्घाटन केले तर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या किनार्‍यावर उद्घाटन करण्यात आले. ही रॅली फक्त गुजरातमध्येच नाही तर देशभरात यानिमित्ताने आयोजित करण्यात आली असून अनेक ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

15 डिसेंबर : गुजरातच्या बडोदामध्ये आज रविवारी नरेंद्र मोदी यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी ‘रन फॉर युनिटी’ ही भव्य रॅली आयोजित केली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी बडोदा येथे या भव्य रॅलीचे उद्घाटन केले तर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या किनार्‍यावर उद्घाटन करण्यात आले. ही रॅली फक्त गुजरातमध्येच नाही तर देशभरात यानिमित्ताने आयोजित करण्यात आली असून अनेक ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होते तर दिग्गज नेत्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्यासाठी देशभरात सुमारे 565 ठिकाणी ‘रन फॉर युनिटी’ हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ऐक्याचे प्रतीक असणारा हा प्रकल्प सरदार सरोवर परिसरात उभारण्यात येणार असून हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या