06 फेब्रुवारी : मुंबईत झालेल्या 13/7 बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी यासीन भटकळ आणि असदुल्ला अख्तरला आज (गुरुवारी) एटीएस कोर्टात हजर करण्यात आलं. या दोघांनाही 18 फेब्रुवारीपर्यंत एटीएस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. इंडियन मुजाहिद्दीनचा कार्यकर्ता यासिन भटकळ बंगळुरू बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असल्याची माहितीही पुढे येतेय. पुण्यात जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड म्हणूनही यासिन भटकळचं नाव पुढे आलं होतं. यासिन हा रियाझ भटकळ याचा साथीदार आहे. मागील वर्षी यासीनला नेपाळच्या बॉर्डरवरुन अटक करण्यात आली होती.