07 ऑगस्ट : दहशतवादी संघटना आयसिसमध्ये सामिल होण्यासाठी निघालेल्या नवी मुंबईचा पत्रकार झुबेर अहमद खानला नवी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीमधील वसंत विहार इथे पोलिसांनी त्याला अटक केली. मला माझं नागरिकत्व परत करायचं असून आयसिसचा प्रवक्ता होण्याची इच्छा असल्याचंही झुबेरने याने फेसबुकवर पोस्ट व्यक्त केली होती. त्याने आपण पत्रकार असल्याचा देखील दावा केला होता. तसंच त्याने आपल्या पोस्टमध्ये याकूब मेमनचा ‘शहीद’ असा उल्लेख केला आहे. झुबेर हा नवी मुंबईचा रहिवासी आहे. एका व्यक्तीने पोलिसांना या वादग्रस्त पोस्टविषयी माहिती दिल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या पथकांनी केलेल्या संयुक्त कारवाईत त्याला पकडण्यात आलं. याआधी मुंबई पोलिसांनी त्याला वांद्रे भागात पकडण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस पोहोचण्याच्या आधी तो पळून गेला. झुबेर हा नवी मुंबईचा राहणारा आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++