16 जुलै : पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी वारकर्यांना आस लागलीये. राज्यभरातून वारकरी पंढरपूरकडे निघाले आहे. यंदा विठ्ठलाचं मंदिर वारकर्यांसाठी लवकर उघडणार आहे. आषाढी एकादशीला भल्या पहाटे 2 वाजून 10 मिनिटांनी विठ्ठल मंदिराचं दार उघडणार आहे.
दरवर्षी पहाटे 5 वाजता विठ्ठल मंदिराचं द्वार खुलं होतं. मात्र यावर्षी दार लवकर उघडण्यात येणार आहे. तसंच आषाढीची नित्यपूजा आणि शासकीय पूजा एकत्रच होणार असल्यानं जास्त वेळ भक्तांना दर्शनाचा लाभ घेता येईल.
जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील मंदिर समितीने यात बदल करून खासगी भाविकांची पूजा रद्द करत केवळ नित्यपूजा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणारी शासकीय पूजा एकाचवेळी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी घेतलाय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++