03 फेब्रुवारी : रशियातल्या मॉस्कोमध्ये एका शाळेत विद्यार्थ्यानेच गोळीबार केल्याची थरारक घटना घडलीय. याच शाळेतील एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने बेछूट गोळीबार केला. यात एक शिक्षक आणि पोलीस कर्मचारी ठार झाले आहे तर आणखी एक पोलीस अधिकारी जखमी आहे.
या बंदुकधारी विद्यार्थ्याने 20 मुलांना काही वेळासाठी ओलीसही धरलं होतं. पण, पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतलंय. ओलीस ठेवलेल्या 20 मुलांची सुटका करण्यात आलीय. ही घटना मॉस्को शहराच्या बाहेर असलेल्या एका शाळेत घडली. बंदूकधारी मुलगा याच शाळेतला विद्यार्थी आहे.
या विद्यार्थ्यांने सुरुवातील 20 विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच त्याने पोलिसांवर बेछुट गोळीबार केलाय. या गोळीबारात एका शिक्षकाचा मृत्यू झाला. तर एका पोलिसाला गोळी लागली त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत्त घोषित केलं. पोलिसांनी या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं. पुढील तपास सुरू आहे.