JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मुंबईत शिवसेनेचा स्वप्नभंग, भाजपने 'करून दाखवलं'

मुंबईत शिवसेनेचा स्वप्नभंग, भाजपने 'करून दाखवलं'

23 फेब्रुवारी : मुंबईत एकहाती सत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेच्या तोंडातून घास अखेरच्या क्षणी हिरावून घेतला. भाजपने कडवी झुंज देत जोरदार मुसंडी मारलीये. शिवसेनेनं 84 जागा पटकावल्या तर भाजपने सेनेपेक्षा 3 जागा कमी जिंकत सत्तेसाठी हालचाल सुरू केली. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं स्वबळावर मैदानात उतर एकमेकांविरोधात शडू ठोकले. प्रचारात कौरव-पांडव ते औकात काढण्यापर्यंत सेना आणि भाजपच्या नेत्यांनी चिखलफेक केली. दोन्ही पक्षांनी एकहाती सत्तेवर दावा ठोकला होता. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

SHIVSENA BJP FLAG 23 फेब्रुवारी : मुंबईत एकहाती सत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेच्या तोंडातून घास अखेरच्या क्षणी हिरावून घेतला. भाजपने कडवी झुंज देत जोरदार मुसंडी मारलीये. शिवसेनेनं 84 जागा पटकावल्या तर भाजपने सेनेपेक्षा 3 जागा कमी जिंकत सत्तेसाठी हालचाल सुरू केली. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं स्वबळावर मैदानात उतर एकमेकांविरोधात शडू ठोकले. प्रचारात कौरव-पांडव ते औकात काढण्यापर्यंत सेना आणि भाजपच्या नेत्यांनी चिखलफेक केली. दोन्ही पक्षांनी एकहाती सत्तेवर दावा ठोकला होता. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेनेनं जोरदार आघाडी घेतली ती अखेरच्या क्षणापर्यंत. भाजपने 94 जागांपर्यंत आघाडी घेतल्यामुळे शिवसेनेचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. त्यामुळे शिवसैनिकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर ढोलताशे वाजून विजयोत्सव सुरू ही केला. पण, अखेरच्या टप्प्यात आकडे बदलले आणि सेनेच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं. पिछाडीवर असलेल्या भाजपने हळूहळू आघाडी घेतली आणि थेट 81 जागांपर्यंत मजल मारली. भाजपचे आकडे वाढत असताना शिवसेनेचे आकडे कमीकमी होत गेले. 94 वरून जागेवरून शिवसेना 84 जागांवर येऊन थांबली. आणि भाजप 81 जागांवर पोहोचली. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन भाजपचा हा मोठा विजय झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्या कामाला मुंबईकरांनी साथ दिलीये. आमचे आकडे फुटाफुटाने वाढले वाढले पण काही जणांचे आकडे फुटपट्टीने वाढले असा टोला सेनेला लगावला. तसंच अपक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहे असंही शेलारांनी स्पष्ट केलं. एकंदरीतच शिवसेना जरी मोठा पक्ष ठरला असला तरी सत्तेचं स्वप्न मात्र भंगलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या