JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / महायुतीत महाधुसफूस, आता गोपीनाथ मुंडे नाराज

महायुतीत महाधुसफूस, आता गोपीनाथ मुंडे नाराज

12 मार्च : भाजपला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यात यश येतं न येतं तोच आता भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे नाराज झाले आहेत. महाराष्ट्रात भाजपचा नेता कोण, हे विचारणार्‍या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्रात नेते आहेत, असं स्पष्ट उत्तर भाजपनं दिलं. पण, फडणवीसांना अधिकार दिल्यानं गोपीनाथ मुंडे नाराज झाले आहे. संबंधित बातम्या {{display_headline}} भाजपच्या कोअर कमिटीची आज (बुधवारी) मुंबईत बैठक होती. या बैठकीला मुंडे गैरहजर होते. पण मुंडे गारपीटग्रस्त भागाच्या दौर्‍यावर गेल्यामुळे ते बैठकीला आले नाहीत, अशी सारवासारव आता भाजप नेत्यांनी केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

munde on sharad pawar 12 मार्च : भाजपला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यात यश येतं न येतं तोच आता भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे नाराज झाले आहेत. महाराष्ट्रात भाजपचा नेता कोण, हे विचारणार्‍या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्रात नेते आहेत, असं स्पष्ट उत्तर भाजपनं दिलं. पण, फडणवीसांना अधिकार दिल्यानं गोपीनाथ मुंडे नाराज झाले आहे.

संबंधित बातम्या

भाजपच्या कोअर कमिटीची आज (बुधवारी) मुंबईत बैठक होती. या बैठकीला मुंडे गैरहजर होते. पण मुंडे गारपीटग्रस्त भागाच्या दौर्‍यावर गेल्यामुळे ते बैठकीला आले नाहीत, अशी सारवासारव आता भाजप नेत्यांनी केली. तसंच महाराष्ट्रात भाजपचे निर्णय कोण घेतं हे उद्धव ठाकरेंनाही माहीत आहे आणि महाराष्ट्रालाही माहीत आहे. हा काही यक्ष प्रश्न नसल्याचं सांगत गोपीनाथ मुंडेंनी भाजपला घरचा अहेर दिलाय. भाजपचे नेते नितीन गडकरी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे उद्धव ठाकरे कमालीचे नाराज आहे. याबद्दल त्यांनी थेट भाजपला धारेवर धरत राज्यात भाजपला अधिकार घेण्याचा निर्णय कुणाला असा सवाल उद्धव यांनी विचारला. उद्धव यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी मंगळवारी संध्याकाळी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव यांची भेट घेतली आणि राज्यात निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना आहे असं सांगितलं. रुडी यांच्या उत्तरामुळे गोपीनाथ मुंडे नाराज झाले. महाराष्ट्रात भाजपचे निर्णय कोण घेतं हे उद्धव ठाकरेंनाही माहीत आहे आणि महाराष्ट्रालाही माहीत आहे अशी प्रतिक्रिया देत मुंडेंनी पक्षालाच घरचा अहेर दिलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या