JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीन चिट ?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीन चिट ?

13 मे : 2008 मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे. एनआयए आज आरोपपत्र दाखल करणार असून यात साध्वीचं नाव नसल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच तसंच कर्नल पुरोहितवर मोक्का लावण्यात येणार नाही असंही कळतंय. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याला आता नवं वळणं मिळालंय.एनआयए आज या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार आहेत, त्यात साध्वी प्रज्ञांचं नाव नसेल, असं सूत्रांकडून कळतंय. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला क्लीन चिट मिळणार असं यावरून दिसतंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

sadhavi 13 मे : 2008 मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे. एनआयए आज आरोपपत्र दाखल करणार असून यात साध्वीचं नाव नसल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच तसंच कर्नल पुरोहितवर मोक्का लावण्यात येणार नाही असंही कळतंय. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याला आता नवं वळणं मिळालंय.एनआयए आज या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार आहेत, त्यात साध्वी प्रज्ञांचं नाव नसेल, असं सूत्रांकडून कळतंय. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला क्लीन चिट मिळणार असं यावरून दिसतंय. तसंच कर्नल पुरोहितवर मोक्का लावण्यात येणार नाहीय तर पुरोहितवर बेकायदेशीर कारवाया करण्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तब्बल 5 वर्षांच्या तपासानंतर प्रत्यक्षदर्शीची साक्ष दबावाखाली नोंदवण्यात आली होती, असं आता एनआयचं म्हणणं आहे. एवढंच नाहीतर या प्रकरणाच्या चौकशीतही चुका होत्या. या प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी केलेल्या तपासाची दिशी चुकली, असंही या आरोपपत्रात म्हणण्यात येणार आहे. साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित सध्या जेलमध्ये आहेत. 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटात 6 जण ठार तर 100 जखमी झाले होते. तपासादरम्यान साध्वी, कर्नल पुरोहीत यांच्याविरुध्द अनेक पुरावे मिळाले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या