25 ऑगस्ट : बेटी म्हणजे धनाची पेटी यासारख्या अनेक उक्त्या किंवा म्हणी समाजात प्रचलीत असल्या अथवा सरकारद्वारे स्त्रीभ्रुण हत्येविरोधी आणि मुलीसाठी विविध योजनांची खैरात केली असली तरी, आजही समाजात मुलगी जन्मल्याचा तिरस्कार या ना त्या प्रकारे व्यक्त होत असतोच. ठाण्यात तर जन्मदात्या आईने आपल्या 5 ते 6 दिवसांच्या तान्ह्या मुलीला चक्क स्कायवॉकवर सोडून दिलं. एका सतर्क रिक्षाचालकामुळे आज हे बाळ सुखरुप आहे. ठाणे पूर्वच्या कोपरी स्कायवॉकवर दत्तात्रय जोईल या रिक्षाचालकाला हे बाळ सापडलं. सोमवारी पहाटे आपली रिक्षा बंद करून दत्तात्रय घरी जात होते. तेव्हा त्यांना स्कायवॉकच्या दिशेनं एका बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी जाऊन पाहिलं तर टॉवेलमध्ये हे नवजात बाळ होतं. त्यांनी स्थानिकांना आणि पोलिसांना लगेचच कळवलं. एका तरुणानं पहाटेच्या वेळी एका महिलेला स्कायवॉकवर बाळ सोडून जाताना पाहिलं. त्यानं तिला हटकण्याचा प्रयत्नही केला. पण की पळून गेली. सध्या या अर्भकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस तिच्या आई-वडिलांचा शोध घेतायत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++