JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / माझे सुरक्षारक्षक मोबाईलवर गेम खेळत बसतात - अण्णा हजारे

माझे सुरक्षारक्षक मोबाईलवर गेम खेळत बसतात - अण्णा हजारे

07 मार्च : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या संरक्षणासाठी सरकारने दिलेल्या सुरक्षा रक्षकांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसं पत्रच अण्णांनी सरकारला लिहिलंय. सुरक्षारक्षक बेपर्वा असून, मोबाईलमध्ये दंग असलेल्या सुरक्षा रक्षकांना मला कोणी मारून गेलं तरी कळणार नाही असा आरोप अण्णा हजारेंनी केला आहे. संबंधित बातम्या {{display_headline}} मी सकाळी बाहेर जाताना, योगासनं करताना या अंगरक्षकांपैकी कुणीही हजर नसतो, कित्येकवेळा ते उशीरा येतात किंवा झोपेतच आसतात. त्यांचा बराच वेळ मोबाईल चॅटिंग करण्यात, गेम खेळण्यात निघून जातो त्यामुळे मला खरंच कुणी खोलीत येऊन ठार केले तर यांना ते समजणारही नाही, असा गंभीर आरोपही अण्णांनी केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
anna-hazare-police

07 मार्च : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या संरक्षणासाठी सरकारने दिलेल्या सुरक्षा रक्षकांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसं पत्रच अण्णांनी सरकारला लिहिलंय. सुरक्षारक्षक बेपर्वा असून, मोबाईलमध्ये दंग असलेल्या सुरक्षा रक्षकांना मला कोणी मारून गेलं तरी कळणार नाही असा आरोप अण्णा हजारेंनी केला आहे.

संबंधित बातम्या

मी सकाळी बाहेर जाताना, योगासनं करताना या अंगरक्षकांपैकी कुणीही हजर नसतो, कित्येकवेळा ते उशीरा येतात किंवा झोपेतच आसतात. त्यांचा बराच वेळ मोबाईल चॅटिंग करण्यात, गेम खेळण्यात निघून जातो त्यामुळे मला खरंच कुणी खोलीत येऊन ठार केले तर यांना ते समजणारही नाही, असा गंभीर आरोपही अण्णांनी केला आहे. माझ्या अडीच हजार लोकवस्तीच्या राळेगणसिद्धी मध्ये 9 अंगरक्षक व 28 पलिसांचा ताफा सुरक्षेसाठी बाळगणे हे सोपे काम नाही. शिवाय सुरक्षा वाढवल्यामुळे सरकारवर खर्चाचा बोजा वाढतोय, तो ही कमी करता येईल. गेल्या वर्षात सातत्याने अण्णा हजारे यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर सरकारने त्यांना झेड सुरक्षा दिली आहे. पण  आण्णांनी पुन्हा एकदा त्यांचं संरक्षण काढून घेण्याची मागणी केली आहे. या संरक्षणाचा मला काहीच उपयोग होत नाही असं अण्णांनी म्हटलंय. सुरक्षा रक्षक आणि पोलीस फक्त वेळकाढूपणा करतात असा आरोपही त्यांनी या पत्रामध्ये केला आहे. भारत पाक युद्धात मरणाशी माझी गाठ पडली होती. त्यामुळे आता मिळाले आहे ते आयुष्य मी बोनस समजतो, असं सांगता आण्णांनी सरकारनं माझी सुरक्षाव्यवस्था काढून घ्यावी मला त्याची गरज नाही अशी विनंती केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या