JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / महिला आयोगाने बजावली विनोद घोसाळकरांना नोटीस

महिला आयोगाने बजावली विनोद घोसाळकरांना नोटीस

17 जानेवारी : शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे प्रकरणी राज्य महिला आयोगाने सेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी भूमिका स्पष्ट करा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा त्यांना देण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी म्हात्रेंची भेट घेतल्यानंतर शिवसैनिक त्यांच्या भेटीला जात आहेत मात्र महापौर अजूनही म्हात्रेंच्या भेटीला आलेले नाही आहेत. आता या वादात काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेच्या नगरसेविकांनी उडी घेतलीय. सर्वपक्षीय महापौरांना घेराव घालणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

vinod ghosalkar 4 17 जानेवारी : शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे प्रकरणी राज्य महिला आयोगाने सेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी भूमिका स्पष्ट करा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा त्यांना देण्यात आला आहे.

गुरुवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी म्हात्रेंची भेट घेतल्यानंतर शिवसैनिक त्यांच्या भेटीला जात आहेत मात्र महापौर अजूनही म्हात्रेंच्या भेटीला आलेले नाही आहेत. आता या वादात काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेच्या नगरसेविकांनी उडी घेतलीय. सर्वपक्षीय महापौरांना घेराव घालणार आहेत.

दरम्यान, शीतल म्हात्रे यांनी आपला प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ झालेला आहे, माझ्या जीवाला धोका दहीसर पोलिसांनी हा जबाब नोंदवून घेतला आहे. आपले काहीही वाईट घडल्यास आमदार विनोद घोसाळकर आणि त्यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर जबाबदार असतील असंही त्यांनी या जबाबात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या