12 मे : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पुणे, मुंबई आणि नाशिकमध्ये मतदार याद्यातून गायब झालेल्या नावं प्रकरणी मुंबई हायकोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिलाय. मतदार याद्यांमधून गहाळ झालेली नावं नोंदवून घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या आधी या नावांचा यादीत समावेश करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत तसंच गहाळ झालेली ही नावं वृत्तपत्रात प्रसिद्ध करायला सांगितलंय. सोबतच फेरमतदान घेण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळून लावली असून 2014च्या निवडणूक निकालांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही हेही स्पष्ट केलं आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पुण्यात लाखो नावं गहाळ झाली होती त्यापाठोपाठ मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्येही नावं गहाळ झाल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी हायकोर्टाने निवडणूक आयोगाला नावं नोंदवून घेण्याचे आदेश दिले आहे मात्र फेरमतदानाची मागणी फेटाळून लावलीय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++