30 जून : भारताच्या अवकाश मोहिमांच्या दृष्टीनं आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे, कारण भारतानं PSLV C-23 उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. 28 जून रोजीच या उपग्रहाचं 48 तासांचं अंतिम काऊंटडाऊन सुरू झालं आणि आज सकाळी 9.52 वाजता डॉ. सतीश धवन स्पेस सेंटरमधून PSLVचं प्रक्षेपण झालं.
प्रक्षेपण पाहण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेस सेंटरमध्ये उपस्थित होते. मोदी यांच्यासह इस्रोचे अध्यक्ष के राधाकृष्णन, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू आणि केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू हेदेखील उपस्थित होते.
या उपग्रहानं फ्रान्स, जर्मन, कॅनडा आणि सिंगापूरच्या उपग्रहांना घेऊन उड्डाण केलं आहे. PSLV C-23 हे अत्याधुनिक उपग्रह आहे. आतापर्यंत 19 देशांमधल्या 35 उपग्रहांची उड्डाणं इस्रोनं केली आहेत. PSLVच्या आधारेच पहिलं चांद्रयान तसंच मंगळ यान मोहीम भारतानं सुरू केली. पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण हे भारतासाठी मोठे यश मानले जात आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++