25 एप्रिल : भाजपच्या मतदारांची नावं जाणीवपूर्णक मतदार याद्यांमधून गहाळ करण्यात आली आहेत असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना फडणवीस यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मतदान याद्यातील घोळाबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
काही दिवसांपूर्वी एका पक्षाचे सन्मानिय आमदार आणि पदाधिकारी आपल्याला भेटले होते. त्यांना काही अधिकारी भेटले होते आणि 300 रुपये दिले तर नावं डिलीट करु. प्रत्येक नावामागे 300 रुपये अशी ऑफर दिली होती असा खुलासा फडणवीस यांनी केला. तसंच तीन महिन्यापूर्वी मुंबईतील भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटलं होतं. रामभाऊ नाईक आणि किरीट सोमय्या या मंडळात होते.
ज्या ठिकाणी भाजपचा मतदारसंघ आहे. तिथे 50 ते 70 हजार नावं यादीतून वगळण्यात आली होती. आणि काँग्रेसचा जिथे मतदारसंघ आहे तिथे 2 ते 3 हजार नावं वगळण्यात आलीय. हे अतिशय चुकीचं आहे. यावरुन असं वाटतं की, यांचा एकमेकांच्या हातात हात आहे असा आरोपही फडणवीस यांनी केला. तसंच आता मतदान झालं असून 35 पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++