15 ऑक्टोबर : सुप्रीम कोर्टाने डान्सबारवरची बंदी उठवलीये. यावर सर्व स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी याबाबत ट्विट केलंय. मुंबईतल्या रोजगार हरवलेल्या बारबालांना नवरात्रीची भेट मिळालीये असं ट्विट शोभा डे यांनी केलंय. तसंच डान्स बार पुन्हा सुरू होणार आहेत. जय महाराष्ट्र…आजा नचले असंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलंय.
विशेष म्हणजे याअगोदरही शोभा डे यांनी मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमांना देण्यात येणार्या प्राईम टाईमवर ट्विट केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे शिवसेनेनं शोभा डेंच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावही मांडण्यात आला होता.
शोभा डेंचं ट्विट “मुंबईतल्या रोजगार हरवलेल्या 75 हजार महिलांना नवरात्रीची भेट मिळालीय. डान्स बार पुन्हा सुरू होणार आहेत! जय महाराष्ट्र! आजा नच ले…”
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++