JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पोलिसांना टार्गेट करू नका, सडेतोड उत्तर देऊ -गृहमंत्री

पोलिसांना टार्गेट करू नका, सडेतोड उत्तर देऊ -गृहमंत्री

12 जुलै : पुणे स्फोट हे पोलिसांसाठी आव्हान आहे या प्रकरणी पोलिसांना टार्गेट केलं जात असलं तरी पोलीस त्याला सडेतोड उत्तर देतील असा विश्वास राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी व्यक्त केला. पुणे स्फोट हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असल्याचं एटीएसनं सांगितलंय. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलाय. तपासासाठी दहा पथकं तैनात करण्यात आली आहेत. पुणे स्फोटाचा एटीएस आणि एनएसजी तपास करत आहेत. शुक्रवारी सकाळी एनएसजीच्या पथकानं घटनास्थळी भेट दिली आणि काही पुरावे गोळा केले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

rr patilll 12 जुलै : पुणे स्फोट हे पोलिसांसाठी आव्हान आहे या प्रकरणी पोलिसांना टार्गेट केलं जात असलं तरी पोलीस त्याला सडेतोड उत्तर देतील असा विश्वास राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी व्यक्त केला. पुणे स्फोट हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असल्याचं एटीएसनं सांगितलंय. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलाय. तपासासाठी दहा पथकं तैनात करण्यात आली आहेत. पुणे स्फोटाचा एटीएस आणि एनएसजी तपास करत आहेत. शुक्रवारी सकाळी एनएसजीच्या पथकानं घटनास्थळी भेट दिली आणि काही पुरावे गोळा केले. हे पुरावे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवण्यात आले आहे. या स्फोटात पोटॅशियम फ्लोराईड, ऍल्युमिनियम नायट्रेट, चारकोल सापडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आता प्रत्यक्ष साक्षीदार आणि इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. सीसीटीव्हीचं कंत्राट घेणार्‍यांवर गुन्हे दाखल करा - अजित पवार दरम्यान, पुण्यात सीसीटीव्हीचं टेंंडर घेणार्‍यावर आणि दिरंगाई करणार्‍यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत केलंय.तर सरकारने 224 कोटींची योजना बनवली असून गणेशोत्सवापूर्वी पुण्यात सीसीटीव्ही बसवण्याचं काम पूर्ण केलं जाईल असं आश्वासन गृहंमत्री आर. आर. पाटील यांनी पुन्हा एकदा दिलंय. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या