16 सप्टेंबर : विसर्जनासाठी मध्यरात्री निघालेल्या पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं आज सकाळी आठच्या सुमारास विसर्जन झालं. अकरा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी काल (गुरुवारी) निघालेल्या विसर्जन मिरवणुका 24 तासांनंतर आजही सुरू आहेत. पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे गुरुवारी सायंकाळपर्यंत विसर्जन झालं असले तरी दगडूशेठ हलवाईसह अन्य गणपतींच्या मिरवणुका मात्र रात्रभर सुरू होत्या. दगडूशेठ हलवाई गणपतीचे आज सकाळी सव्वाआठच्या सुमारास विसर्जन झालं. ढोल ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींची मिरवणूक काढण्यात आली. पावसाच्या व्यत्ययाला न जुमानता, पुण्यात सकाळीच गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली, ती आजही कायम आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv