JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पाटणा स्फोटातील संशयिताचा मृत्यू

पाटणा स्फोटातील संशयिताचा मृत्यू

01 नोव्हेंबर : पाटणा साखळी बॉम्बस्फोटातल्या एका जखमी संशयित आरोपीचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या स्फोटात मरण पावलेल्यांची संख्या आता 7 वर गेलीय. पाटणा स्फोटाचा तपास सुरू आहे पण एनआयए आणि बिहार पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब म्हणजे या स्फोटातला एक संशयित आरोपी मेहर आलम कालच्या चौकशीदरम्यान पळून गेलाय. स्फोटातला प्रमुख संशयित आरोपी हैदरचा ठाव ठिकाणा आपल्याला माहीत आहे असा दावा मेहर आलमने केला होता. पण हैदरचा तपास लागण्याआधीच हा आलम मुजफ्फरपूरच्या हॉटेलमधून पळून गेला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

patna blast new 34 01 नोव्हेंबर : पाटणा साखळी बॉम्बस्फोटातल्या एका जखमी संशयित आरोपीचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या स्फोटात मरण पावलेल्यांची संख्या आता 7 वर गेलीय.

पाटणा स्फोटाचा तपास सुरू आहे पण एनआयए आणि बिहार पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब म्हणजे या स्फोटातला एक संशयित आरोपी मेहर आलम कालच्या चौकशीदरम्यान पळून गेलाय. स्फोटातला प्रमुख संशयित आरोपी हैदरचा ठाव ठिकाणा आपल्याला माहीत आहे असा दावा मेहर आलमने केला होता.

पण हैदरचा तपास लागण्याआधीच हा आलम मुजफ्फरपूरच्या हॉटेलमधून पळून गेला. याच हॉटेलमध्ये एनआयएची टीमही थांबली होती. एनआयएनं मात्र आलम हा स्फोटाचा साक्षीदार आहे, संशयित नाही, असा दावा केलाय. या प्रकरणी आता एफआयआर नोंदवण्यात आलाय. आता आलम आणि मुख्य संशयित तेहसीन अख्तर यांचा तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या