JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / परमारांच्या डायरीतील ES नाव कुणाचं ?, राष्ट्रवादीचा पलटवार

परमारांच्या डायरीतील ES नाव कुणाचं ?, राष्ट्रवादीचा पलटवार

01 डिसेंबर : बिल्डर सूरज परमार आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नाव समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीने पलटवार केलाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका मंत्र्यांवरच निशाणा साधलाय. परमार यांच्या डायरीतील ES नावाचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी मलिक यांनी केली. आत्महत्येपूर्वी सूरज परमार यांनी लिहिलेल्या डायरीत काही नावांचा उल्लेख केला होता. त्यातील 4 नाव ही नगरसेवकांची होती त्यांना अटक करण्यात आलीये. पण, याच डायरीत ES नावाचा उल्लेख आहे. मंत्रिमंडळामध्ये हे ES म्हणजे नेमकं कोण याचीही चौकशी व्हावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केलीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

malik on parmar case 01 डिसेंबर : बिल्डर सूरज परमार आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नाव समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीने पलटवार केलाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका मंत्र्यांवरच निशाणा साधलाय. परमार यांच्या डायरीतील ES नावाचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी मलिक यांनी केली.

आत्महत्येपूर्वी सूरज परमार यांनी लिहिलेल्या डायरीत काही नावांचा उल्लेख केला होता. त्यातील 4 नाव ही नगरसेवकांची होती त्यांना अटक करण्यात आलीये. पण, याच डायरीत ES नावाचा उल्लेख आहे. मंत्रिमंडळामध्ये हे ES म्हणजे नेमकं कोण याचीही चौकशी व्हावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केलीय. सूरज परमार केसमध्ये सरकारी वकिलांनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचा उल्लेख केल्यानंतर मलिकांनी हा आरोप केलाय. सूरज परमार केसमधील आरोपी आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या बँक अकाऊंटवरून 1 कोटी रुपये आव्हाडांच्या खात्यात जमा झाल्याचा खुलासा सरकारी वकील राजा ठाकरे यांनी हायकोर्टात केला होता.त्यानंतर राष्ट्रवादीकडून हा पलटवार करण्यात आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या