19 ऑक्टोबर : नंदुरबार मतदार संघातून भाजपचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत हे विजयी झाले आहेत. गावित 1,01, 328 मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे कुणाल वसावे यांचा पराभव केला.
लोकसभा निवडणुकीत गावित यांची कन्या हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीने विजयकुमार गावित यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली होती. ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावितांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
विशेष म्हणजे गावितांवर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल असूनही भाजपने गावितांना पक्षात प्रवेश दिला आणि गावित हे विजयीही झाले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++