JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'त्या' अधिकार्‍यांकडून 'आदर्श'ची चौकशी काढून घ्या'

'त्या' अधिकार्‍यांकडून 'आदर्श'ची चौकशी काढून घ्या'

मुंबई 20 जून : आदर्श सोसायटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी वादात सापडली आहे. आदर्श घोटाळ्याची चौकशी करणारे अधिकारीच सरकारचे लाभार्थी असल्याची बातमी आयबीएन लोकमतने दाखवली होती. आता यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अभीक मोडक आणि राजकुमार व्हटकर या अधिकार्‍यांकडून आदर्शची चौकशी काढून घ्या अशी मागणी विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केली आहे. तर सीबीआयमध्येही भ्रष्टाचार आहे आणि हे उघड झालंय. यावर अंकुश बसावा यासाठी लोकपाल असावा याबद्दल देशभर चर्चा झाली पण तरीही सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

vinoad tavade मुंबई 20 जून : आदर्श सोसायटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी वादात सापडली आहे. आदर्श घोटाळ्याची चौकशी करणारे अधिकारीच सरकारचे लाभार्थी असल्याची बातमी आयबीएन लोकमतने दाखवली होती. आता यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अभीक मोडक आणि राजकुमार व्हटकर या अधिकार्‍यांकडून आदर्शची चौकशी काढून घ्या अशी मागणी विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केली आहे. तर सीबीआयमध्येही भ्रष्टाचार आहे आणि हे उघड झालंय. यावर अंकुश बसावा यासाठी लोकपाल असावा याबद्दल देशभर चर्चा झाली पण तरीही सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. आदर्श प्रकरणात झालेल्या या नव्या खुलास्यामुळे सीबीआयची चौकशी काढून घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या