JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / ...तर आत्मघातकी हल्ले योग्य -झाकिर नाईक

...तर आत्मघातकी हल्ले योग्य -झाकिर नाईक

15 जुलै : मी दहशतवाद्यांना प्रेरणा मिळेल अशी कोणतीही भाषणं दिली नाही. आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यांचं मी समर्थन करत नाही, पण युद्धामध्ये देशहितासाठी जर आत्मघातकी हल्ले होत असेल तर ते योग्यच आहे असं वक्तव्य इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक डॉ. झाकिर नाईकनं केलंय. एवढंच नाहीतर मी शांतीदूत आहे असा दावाही नाईक याने केला. ढाका हल्ल्यातील दहशतवादी झाकिर नाईकच्या भाषणामुळे प्रभावित असल्याची बाबसमोर आल्यानंतर झाकिर नाईक गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर आला. अखेर चार दिवसांनंतर नाईकने सौदीतील मदिनातून स्काईपवरुन मुंबईत पत्रकार परिषदेत हजर राहिला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

15 जुलै : मी दहशतवाद्यांना प्रेरणा मिळेल अशी कोणतीही भाषणं दिली नाही. आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यांचं मी समर्थन करत नाही, पण युद्धामध्ये देशहितासाठी जर आत्मघातकी हल्ले होत असेल तर ते योग्यच आहे असं वक्तव्य इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक डॉ. झाकिर नाईकनं केलंय. एवढंच नाहीतर मी शांतीदूत आहे असा दावाही नाईक याने केला.

zhakir_naik4 ढाका हल्ल्यातील दहशतवादी झाकिर नाईकच्या भाषणामुळे प्रभावित असल्याची बाबसमोर आल्यानंतर झाकिर नाईक गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर आला. अखेर चार दिवसांनंतर नाईकने सौदीतील मदिनातून स्काईपवरुन मुंबईत पत्रकार परिषदेत हजर राहिला. आत्मघातकी हल्ल्यामध्ये सामान्य लोकांचे जीव जातो, त्याचा आम्ही निषेध करतो असं तो म्हणाला. मीडियानं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, माझे काही व्हिडिओ पूर्ण दाखवले नाही असा आरोप त्याने केला. त्याचवेळी सरकारनं चौकशी केली तर कोणतीही माहिती द्यायला माझा विरोध नाही असं नाईकनं म्हटलंय.

तसंच माझे मागिली भाषणं जर ऐकली आणि तर तुम्हाला मी शांततेचा दूत दिसेल असा दावा नाईकने केला. पत्रकारांनी त्याच्या या दाव्यानंतर जर तुम्ही शांतीदूत आहात तर भारतात का नाही परतला असा प्रश्न केला असता त्याने उत्तर देण्याचं टाळलं. तसंच निष्पाप लोकांच्या बळी घेणार्‍या आत्मघातकी हल्ल्यांना इस्लाममध्ये मान्यता नाही. असे हल्ले हे ‘हराम’ आहे. पण, युद्धाच्या वेळी असे करणे योग्य आहे असंही नाईक म्हणाला. विशेष म्हणजे, नाईकची पत्रकार परिषद सकाळी 10 वाजता सुरू होणार होती. मात्र, ती सुरू व्हायला जवळपास 2 तास उशीर झाला. तांत्रिक कारणामुळे ही पत्रकार परिषद उशिरा सुरू झाल्याचं कारण नाईकच्या वकिलांनी दिलं.

संबंधित बातम्या

जाहिरात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या