25 जानेवारी : देशातील प्रतिष्ठेचे आणि सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयानं 127 जणांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याची दखल घेत सरकारनं त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.
गेली चौदा वर्ष नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठी राज्यभर मोठं काम केलं. जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आणण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. पुण्यात दिवसाढवळ्या दाभोलकरांवर गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यानंतर सरकारला जाग आली आणि त्यांनी लगेचच हिवाळी अधिवेशनात जादुटोणाविरोधी कायदा मंजूर करुन घेतला.
पण त्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना आपले प्राण गमवावे लागले. आणि केंद्र सरकारनंही पद्मश्री पुरस्कार देऊन मरणोत्तरच त्यांच्या कार्याची दखल घेतली. मात्र यावरुन अंनिसची कार्यकर्ती आणि दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी दुःख व्यक्त केलंय.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकरांना पद्मविभूषण
रसायनशास्त्रात केलेल्या अतुलनिय कामगिरी करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. माशेलकर यांनी रसायनशास्त्र विषयात केलेल्या बहुमोल कामगिरीची दखल सरकारने घेतलीय. सरकारनं अजून पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केलेली नाही. पण, डॉ. माशेलकर यांनीच पद्मविभूषण पुरस्काराबद्दलची माहिती दिलेली आहे.
तसंच माशेलकर यांनी हळद आणि इतर भारतीय पेटंट्ससाठी लढून तो लढा यशस्वी करुन दाखवला होता. त्यामुळे जगात भारतीय वस्तूंची मक्तेदारी कायम राहिली. या लढाईत डॉ. माशेलकर यांची महत्त्वाची भूमिका होती. डॉ. माशेलकर यांनी मुंबईत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं. आणि विज्ञान क्षेत्रात भारताला जगात मानाचं स्थान मिळवून दिलं. डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे योगदान
पद्मविभूषण पुरस्कारचे मानकरी
पद्मभूषण पुरस्कारचे मानकरी
पद्मश्री पुरस्कारचे मानकरी