JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / टोलप्रकरणी राज ठाकरेंवर कारवाई होणार?

टोलप्रकरणी राज ठाकरेंवर कारवाई होणार?

30 जानेवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौर्‍यावर आहेत. टोलबाबत चिथावणीखोर भाषण केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात पुणे जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर आजपासून सुरु होणारा राज ठाकरेंचा 4 दिवसांचा पुणे दौरा चर्चेत आला आहे. संबंधित बातम्या {{display_headline}} राज ठाकरे आज दुपारी 12 वाजता पुण्यात दाखल होतील त्यामुळे याप्रकरणी पोलीस काय कारवाई करताहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज ठाकरेंच्या अटकेवरून सत्ताधारी काँग्रेेस-राष्ट्रवादीतच मतभेद निर्माण झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Image mumob_2108_raj_thackrey_vis_300x255.jpg 30 जानेवारी :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौर्‍यावर आहेत. टोलबाबत चिथावणीखोर भाषण केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात पुणे जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर आजपासून सुरु होणारा राज ठाकरेंचा 4 दिवसांचा पुणे दौरा चर्चेत आला आहे.

संबंधित बातम्या

राज ठाकरे आज दुपारी 12 वाजता पुण्यात दाखल होतील त्यामुळे याप्रकरणी पोलीस काय कारवाई करताहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज ठाकरेंच्या अटकेवरून सत्ताधारी काँग्रेेस-राष्ट्रवादीतच मतभेद निर्माण झाले आहेत. दौर्‍याच्या कार्यक्रमानूसार उद्या सकाळी मनसेच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा बीएमसीसी कॉलेजमध्ये होणार आहे. या मेळाव्यात आगामी निवडणुकीची रणनिती ठरणार आहे. 1 फेब्रुवारीला राज ठाकरे पुण्यातील नगरसेवकांची झाडाझडती घेणार असल्याचं समजतेय. तर 2 फेब्रुवारीचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या