JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / जलालाबादमध्ये भारतीय दुतावासाजवळ आत्मघातकी हल्ला, सर्व भारतीय सुखरुप

जलालाबादमध्ये भारतीय दुतावासाजवळ आत्मघातकी हल्ला, सर्व भारतीय सुखरुप

अफगाणिस्तान - 02 मार्च : अफगाणिस्तानामध्ये पुन्हा एकदा भारतीय दुतावासाला टार्गेट करण्यात आलं. भारतीय दुतावासाजवळ आत्मघातकी हल्ला झाला आहे. जलालाबाद शहरात ही घटना घडली आहे. दुतावासापासून 100 मीटर अंतरावर दोन स्फोट झाले. या हल्ल्यात एका अफगाणिस्तानी नागरिकाचा मृत्यू झालाय. सुदैवाने या हल्ल्यात सर्व भारतीय सुखरुप आहे. 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. एका आत्मघातकी दहशतवाद्यांने स्वत:ला स्फोटाने उडवून घेतलं. स्फोटानंतर तैनात असलेल्या पोलिसांनी आणि अफगान पोलिसांमध्ये दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

afgn_attack अफगाणिस्तान - 02 मार्च : अफगाणिस्तानामध्ये पुन्हा एकदा भारतीय दुतावासाला टार्गेट करण्यात आलं. भारतीय दुतावासाजवळ आत्मघातकी हल्ला झाला आहे. जलालाबाद शहरात ही घटना घडली आहे. दुतावासापासून 100 मीटर अंतरावर दोन स्फोट झाले. या हल्ल्यात एका अफगाणिस्तानी नागरिकाचा मृत्यू झालाय. सुदैवाने या हल्ल्यात सर्व भारतीय सुखरुप आहे. 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. एका आत्मघातकी दहशतवाद्यांने स्वत:ला स्फोटाने उडवून घेतलं. स्फोटानंतर तैनात असलेल्या पोलिसांनी आणि अफगान पोलिसांमध्ये दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी एक ग्रॅनेड दुतावासाच्या आतमध्ये फेकला होता. आणि दुतावासाबाहेर एक स्फोट घडवला. या स्फोटात 8 कार चक्काचूर झालायत. शेजारील इमारतीना ही तडे गेले आणि काचा फुटल्यात. याआधीही जलालाबादमध्ये पाकिस्तानच्या दुतावासावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात 3 दहशतवादी ठार झाले होते आणि सात अफगान जवान शहीद झाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या