06 मे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीमध्ये एक तृतीयांश हिस्सा मिळावा आणि या संपत्तीची वाटणी होत नाही तोपर्यंत संपत्ती विकण्यास मज्जाव करावा अशी मागणी करणारा जयदेव ठाकरे यांचा याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळला.
बाळासाहेबांच्या मालमत्तेत हक्क मागताना योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब जयदेव यांनी केलेला नाही, असे स्पष्ट करत मुंबई हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. मात्र जयदेव यांना स्वतंत्र याचिकेद्वारे हा दावा करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचेही न्यायालयाने या वेळी सूचित केले.
बाळासाहेब ठाकरे यांनी मृत्युपूर्वी आपल्या संपत्तीबाबत मृत्युपत्र केलं आहे . याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी प्रोबेट याचिका हायकोर्टात केली होती त्याविरोधात जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेत सुरवातीला त्यांनी या प्रोबेटला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारा अर्ज हायकोर्टानं काही दिवसांपू्र्वी फेटाळला होता. त्यानंतर जयदेव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीमध्ये एक तृतीयांश हिस्सा मिळावा आणि या संपत्तीची वाटणी होत नाही तोपर्यंत संपत्ती विकण्यास मज्जाव करावा हा अर्ज केला होता हा अर्जही न्यायालयानं फेटाळला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++