20 डिसेंबर: रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या ‘जग्गा जासूस’चं ट्रेलर रिलीज झालंय. हे ट्रेलर डिस्ने फाॅर्मेटमध्ये डिझाइन केलंय.यात काही संवाद नाहीत. म्युझिक आणि आवाजाचा वापर करून प्रेक्षकांपर्यंत सिनेमात काय आहे ते पोचवण्याचा प्रयत्न केलाय. दिग्दर्शक अनुराग बासूनं हे ट्रेलर लाइव्ह अॅनिमेशन स्वरूपात बनवलंय.यात रणबीर गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. आपल्या वडिलांच्या शोधात निघालेला हा जासूसला कतरिना भेटते. रणबीर या सिनेमाची निर्मितीही करतोय. निर्मिती क्षेत्रात रणबीरचं हे पहिलं पाऊल आहे. 7 एप्रिल 2017 रोजी हा सिनेमा रिलीज होईल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv