JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / चौथ्या दिवशीही डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन, राज्यभरात पडसाद

चौथ्या दिवशीही डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन, राज्यभरात पडसाद

23 मार्च : मार्डच्या डॉक्टरांचं सामूहिक रजा आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरुच आहे. बुधवारी मार्डच्या डॉक्टरांचं आंदोलन संपलं असं वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं. मात्र, मार्ड आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे डॉक्टरांचं आंदोलन आता जास्त चिघळण्याची शक्यता आहे. मुंबईत काही सरकारी हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरुच आहे. तर दुसरीकडे राज्यभरातले खाजगी डॉक्टर आज संपावर आहेत. संबंधित बातम्या {{display_headline}} मुंबईतील सायन हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री सायन रुग्णालयामधील बालरोग तज्ज्ञ डॉ.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
doctors-strike-at-kem_b808e15c-646f-11e5-b95f-5445df9fcc89

23 मार्च : मार्डच्या डॉक्टरांचं सामूहिक रजा आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरुच आहे. बुधवारी मार्डच्या डॉक्टरांचं आंदोलन संपलं असं वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं. मात्र, मार्ड आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे डॉक्टरांचं आंदोलन आता जास्त चिघळण्याची शक्यता आहे.

मुंबईत काही सरकारी हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरुच आहे. तर दुसरीकडे राज्यभरातले खाजगी डॉक्टर आज संपावर आहेत.

संबंधित बातम्या

मुंबईतील सायन हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री सायन रुग्णालयामधील बालरोग तज्ज्ञ डॉ. मानसी यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यांसंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निषेधार्थ काल रात्रीपासून पुन्हा डॉक्टरांनी आपलं आंदोलन तीव्र केलं आहे. सायन हाॅस्पिटलबाहेर डॉक्टरांनी धरणं आंदोलन सुरू ठेवलं आहे. राज्यभरात या आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत.

आज हायकोर्टात डॉक्टरांविरोधातल्या कारवाईच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मार्डच्या डॉक्टरांचं आंदोलन संपलं असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता, मात्र मार्ड आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम असल्यानं आज हायकोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

जाहिरात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या