JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / कोल्हापुरात सीरिअल किलरची दहशत !

कोल्हापुरात सीरिअल किलरची दहशत !

संदीप राजगोळकर,कोल्हापूर 17 जून : कोल्हापुरात गेल्या दोन महिन्यांपासून साखळी खून विशिष्ट पद्धतीनं होत आहे. गेल्या 2 महिन्यांत शहरात 8 खून झालेत. त्यातले 6 खून सीरियल किलिंग असल्याची चर्चा आहे. शहरातला रेल्वे स्टेशन परिसर…याच परिसरात सध्या सीरियल किलरनं धुमाकूळ घातलाय. गेल्या 2 महिन्यांत या भागात डोक्यात दगड घालून 6 खून करण्यात आलेत …त्यामुळे शहरात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालंय. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा….मात्र त्यांच्या जिल्ह्यातलं पोलीस दल निष्क्रिय झाल्याचा आरोप शिवसेना करतेय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

kolhapur ciriyal killer संदीप राजगोळकर,कोल्हापूर

17 जून : कोल्हापुरात गेल्या दोन महिन्यांपासून साखळी खून विशिष्ट पद्धतीनं होत आहे. गेल्या 2 महिन्यांत शहरात 8 खून झालेत. त्यातले 6 खून सीरियल किलिंग असल्याची चर्चा आहे.

शहरातला रेल्वे स्टेशन परिसर…याच परिसरात सध्या सीरियल किलरनं धुमाकूळ घातलाय. गेल्या 2 महिन्यांत या भागात डोक्यात दगड घालून 6 खून करण्यात आलेत …त्यामुळे शहरात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालंय. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा….मात्र त्यांच्या जिल्ह्यातलं पोलीस दल निष्क्रिय झाल्याचा आरोप शिवसेना करतेय. तसंच पोलीस तपासामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचाही आरोप करण्यात येतोय.

रेल्वे स्टेशन भागात झालेले खून सीरियल किलिंगचा प्रकार नसल्याचा दावा पोलीस करत आहेत. मात्र ज्यांच्या खून झालाय त्या व्यक्तींकडे कोणतीही मौल्यवान वस्तू आढळलेली नाही त्यामुळे शहरातील हे खून नेमक्या कोणत्या कारणांसाठी होताहेत याच उत्तर मात्र कोणाकडेच नाहीय.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या