28 जुलै : कर्नाटकामध्ये महाराष्ट्राबद्दलची दडपशाही सुरूच आहे. कर्नाटक विधानसभेत आज येळ्ळूर प्रकरणाचे पडसाद उमटले. सीमाभागात मराठीजनांसाठी लढा देणार्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला, अशी मागणी विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर यांनी केलीय. एवढंच नाहीतर सीमाभागातल्या मराठी आमदारांना अटक करा, अशी मागणीही त्यांनी केलीय.
तर एकीकरण समितीवर बंदीबाबत विचार करू, असं आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिलंय. आज कर्नाटकच्या विधानसभेवर कन्नड संघटनांनी मोठा मोर्चा काढला होता.
दरम्यान, येळ्ळूरमध्ये मराठी फलक काढून टाकण्याच्या प्रकारानंतर आज बेळगाव-निप्पाणीमध्ये बंद पुकारण्यात आला होता. येळ्ळूरमध्येही बंद पुकारण्यात आलाय. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव बंद पुकारलाय. पोलिसांनी काल मराठी भाषक कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केली होती, त्याविरोधात हा बंद पुकारण्यात आलाय.
निप्पाणीमधील बंद 100 टक्के यशस्वी झाला आहे. निपाणी मधील सगळे व्यवहार, बाजारपेठा बंद आहेत. दरम्यान, पोलीस सहआयुक्त हेमंत निंबाळकर यांनी येळ्ळुरला भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान बेळगावमधल्या कडोळी, करंग्राली, बाची या तीन गावातले फलक पुन्हा लावण्यात आले आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++