JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / कलमाडींची सावध खेळी,आयअोएचं अध्यक्षपद नाकारलं

कलमाडींची सावध खेळी,आयअोएचं अध्यक्षपद नाकारलं

28 डिसेंबर : सुरेश कलमाडींनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचं मानद आजीवन अध्यक्षपद नाकारलंय. या संघटनेच्या अध्यक्षपदी कलमाडींची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. त्यामुळे कलमाडींनी हा निर्णय घेतलाय. मला हा मान दिल्याबद्दल मी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे आभार मानतो. पण सध्या मी हे अध्यक्षपद स्वीकारणं योग्य होणार नाही, असं कलमाडी यांनी म्हटलंय. माझ्यावरच्या सगळ्या आरोपांमधून मी मुक्त होईन, असा मला विश्वास आहे, असंही ते म्हणाले. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या आजीवन अध्यक्षपदी सुरेश कलमाडी आणि अभय चौटाला यांची निवड झाली होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

kalmadi_ioa 28 डिसेंबर : सुरेश कलमाडींनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचं मानद आजीवन अध्यक्षपद नाकारलंय. या संघटनेच्या अध्यक्षपदी कलमाडींची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली.  त्यामुळे कलमाडींनी हा निर्णय घेतलाय. मला हा मान दिल्याबद्दल मी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे आभार मानतो. पण सध्या मी हे अध्यक्षपद स्वीकारणं योग्य होणार नाही, असं कलमाडी यांनी म्हटलंय. माझ्यावरच्या सगळ्या आरोपांमधून मी मुक्त होईन, असा मला विश्वास आहे, असंही ते म्हणाले. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या आजीवन अध्यक्षपदी सुरेश कलमाडी आणि अभय चौटाला यांची निवड झाली होती. दिल्लीमध्ये मंगळवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांची एकमताने निवड झाली. सुरेश कलमाडी हे कॉमनवेल्थ घोटाळ्यात आरोपी असतानाही त्यांची निवड झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यासोबतच अभय चौटाला यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सुरेश कलमाडी हे १९९६ ते २०११ या काळात इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते.  दिल्ली कॉमनवेल्थ घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यांना १० महिने तुरुंगातही जावं लागलं होतं. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या