27 जुलै : बेळगावमध्ये पुन्हा उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक कर्नाटक पोलिसांनी रविवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात पुन्हा काढून टाकला आहे. या घटनेनंतर येळ्ळूरमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी मराठी भाषिक नेत्यांची धरपकड सुरू केली. कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिक लोकांवर अमानुष लाठीमार केला. लोकांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली. महिलांनाही पोलिसांनी मारहाण केली. पोलिसांनी आपले पैसे आणि मोबाईलही नेल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. 50 जणांवर लाठीमार केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
बेळगावमध्ये पुन्हा कानडी वरवंटा चालला आणि सीमा भागातलं अस्मितेचं प्रतिक समजल्या जाणार्या आणि गेल्या 56 वर्षांपासून बेळगाव तालुक्यातल्या येळ्ळूर गावाच्या वेशीवरचा ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक कर्नाटक सरकारने पोलिसी दडपशाही आणि बळाचा वापर करून काढून टाकला होता. पण ‘मोडेल पण वाकणार नाही’ असा मराठी बाणा दाखवत सीमा भागातल्या मराठीजनांनी पुन्हा एकदा येळ्ळूरला फलक उभारला. ज्या ठिकाणी हा चौथरा तोडण्यात आला होता त्याच ठिकाणी गावकर्यांनी नव्याने फलक उभारला आहे. मात्र काल रात्री कर्नाटक पोलिसांनी पुन्हा एकदा दंडेली दाखवत हा फलक उद्ध्वस्त केला. हा प्रकार समजताच मराठी भाषिकांनी विरोध दर्शवला. मात्र कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करत महिला आणि तरुणांवर लाठीमार केला. मराठी भाषिक तरुण तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. येळ्ळूरसह आजूबाजूच्या परिसरात उद्या रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असून या भागाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे. दरम्यान, सीमा भागाचे नेते किरण ठाकूर आज मुंबईमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. बेळगावातल्या मराठी फलकांचं रक्षण करण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी संसदेत आवाज उठवावा, अशी किरण ठाकूर यांनी मागणी केली आहे.
या सगळ्याचा प्रकरणाचा इतिहास
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++