21 मार्च : कपिल आणि सुनील ग्रोवर प्रकरण संपत नाही, तोवर विद्या बालनही कपिलवर नाराज झाल्याची बातमी आलीय. विद्या कपिल शर्मा शोच्या सेटवर ‘बेगम जान’चं प्रमोशन करायला आलेली असताना, कपिलनं तिला सहा तास वाट पाहायला लावली. विद्या बालन या शोसाठी पोचली,पण कपिलचा पत्ता नसल्यानं तिला त्याची वाट पाहत थांबावं लागलं, तेही तब्बल 6 तास. त्यानंतर ती निघून जायला निघाली,तेव्हा कपिलनं तिला फोन करून तिची माफी मागितली. कपिल सेटवर आला आणि शो सुरू झाला. पण तिथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार विद्या बालन कपिलशी फारसं बोलत नव्हती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv