JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / ऐतिहासिक; रिओ ऑलंपिकच्या व्हॉल्ट प्रकारात दीपा कर्माकर फायनलमध्ये

ऐतिहासिक; रिओ ऑलंपिकच्या व्हॉल्ट प्रकारात दीपा कर्माकर फायनलमध्ये

08 आॅगस्ट : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून सातत्यानं निराशा होत असताना ऍथलिट दीपा कर्माकरनं ऐतिहासिक कामगिरी करत देशवासियांना सुखद धक्का दिला आहे. जिम्नॅस्टिक वॉल्ट या प्रकारात दीपानं अंतिम फेरी गाठली आहे. आता भारतीय प्रमाणवेळेनुसार, 14 ऑगस्टला रात्री 11.15 वाजता जिम्नॅस्टिक व्हॉल्ट प्रकाराची अंतिम फेरी होणार आहे. तिथे दीपा इतिहास रचणार का, याकडे देशाचं लक्ष लागलंय. संबंधित बातम्या {{display_headline}} रिओ ऑलिंपिकमध्ये हॉकी आणि रोइंग वगळता भारताच्या पदरी निराशाच आली आहे. त्यात महिला तिरंदाजांनीही नेम चुकवला असताना, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दीपा कर्माकरनं जिम्नॅस्टिक व्हॉल्टच्या अंतिम फेरीत धडक मारली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
Dipa-Karmakar_REUTERS-FB-1200-e1470560560502

08 आॅगस्ट :  रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून सातत्यानं निराशा होत असताना ऍथलिट दीपा कर्माकरनं ऐतिहासिक कामगिरी करत देशवासियांना सुखद धक्का दिला आहे. जिम्नॅस्टिक वॉल्ट या प्रकारात दीपानं अंतिम फेरी गाठली आहे. आता भारतीय प्रमाणवेळेनुसार, 14 ऑगस्टला रात्री 11.15 वाजता जिम्नॅस्टिक व्हॉल्ट प्रकाराची अंतिम फेरी होणार आहे. तिथे दीपा इतिहास रचणार का, याकडे देशाचं लक्ष लागलंय.

संबंधित बातम्या

रिओ ऑलिंपिकमध्ये हॉकी आणि रोइंग वगळता भारताच्या पदरी निराशाच आली आहे. त्यात महिला तिरंदाजांनीही नेम चुकवला असताना, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दीपा कर्माकरनं जिम्नॅस्टिक व्हॉल्टच्या अंतिम फेरीत धडक मारली. पात्रता फेरीत 14.850 गुण मिळवत दीपाने आठवं स्थान पटकावलं. जिम्नॅस्टिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. अनइव्हन बार, बॅलेंसिंग बीम आणि फ्लोअर एक्सरसाईज या तीन प्रकारांत दीपाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. पण, व्हॉल्ट प्रकारात पहिल्या प्रयत्नांत 15.100 गुणांची नोंद केली. दीपाने अनइव्हन बारमध्ये 11.666, बॅलन्सिंग बिममध्ये 12.866 आणि फ्लोअर एक्सरसाईजमध्ये 12.033 गुण मिळविले. कॅनडाच्या प्रतिस्पर्ध्यांनी मोक्याच्या क्षणी दर्जेदार खेळ केल्यानं दीपा सहाव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर गेली. पण तिनं अंतिम फेरी गाठत पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या