JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'एलजीबीटी'चा काँग्रेस आणि 'आप'कडे कल !

'एलजीबीटी'चा काँग्रेस आणि 'आप'कडे कल !

10 एप्रिल : देशभरात भाजपच्या बाजूने हवा आहे, असं अनेक सर्व्हेंवरुन दिसतंय. पण आपल्या समाजातच एक वर्ग असा आहे ज्यांचा कल काँग्रेसकडे आहे..हा वर्ग आहे एलजीबीटी (LGBT). देशातले गे, लेसबीयन, बायसेक्शुअल आणि तृतीयपंथी यांचा काँग्रेसला साथ आहे. गे पुरुष, लेस्बियन स्त्रिया, बायसेक्शुअल आणि तृतीयपंथीयांमध्ये हमसफर ट्रस्टने एक सर्व्हे केला. या सर्व्हेनुसार मुंबईतल्या 869 लोकांना राजकीय प्रश्न विचारण्यात आले. त्यात 45 टक्के मतदारांचा कल हा काँग्रेसकडे आहे. 42 टक्के मतदारांचा ‘आप’ला मतदान करण्याचा विचार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

10 एप्रिल : देशभरात भाजपच्या बाजूने हवा आहे, असं अनेक सर्व्हेंवरुन दिसतंय. पण आपल्या समाजातच एक वर्ग असा आहे ज्यांचा कल काँग्रेसकडे आहे..हा वर्ग आहे एलजीबीटी (LGBT). देशातले गे, लेसबीयन, बायसेक्शुअल आणि तृतीयपंथी यांचा काँग्रेसला साथ आहे. गे पुरुष, लेस्बियन स्त्रिया, बायसेक्शुअल आणि तृतीयपंथीयांमध्ये हमसफर ट्रस्टने एक सर्व्हे केला. या सर्व्हेनुसार मुंबईतल्या 869 लोकांना राजकीय प्रश्न विचारण्यात आले. त्यात 45 टक्के मतदारांचा कल हा काँग्रेसकडे आहे. 42 टक्के मतदारांचा ‘आप’ला मतदान करण्याचा विचार आहे. तर फक्त 13 टक्के मतदारांचा भाजपला पाठिंबा आहे. काँग्रेसने समलिंगींच्या हक्कांना उघड पाठिंबा जाहीर केला आहे. आणि भाजपने समलिंगींच्या हक्कांना विरोध केला आहे. समलिंगींविरोधात असलेल्या कलम 377ला काँग्रेसचा विरोध, तर भाजपचा मात्र पाठिंबा आहे. त्यामुळे एलजीबीटीने आपलं मत काँग्रेसच्या पारड्यात टाकण्याचं ठरवलंय.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या