14 ऑगस्ट : अभिनेता आमिर खानच्या आगामी पीके सिनेमाच्या न्यूड पोस्टरवरुन वाद निर्माण झाला होता. मात्र आता आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानींना दिलासा मिळाला आहे. पीकेमधल्या आमिर खानच्या न्यूड पोस्टरविरुद्धची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. करमणूक ही करमणूक आहे, आपल्याला ती आवडत नसेल तर पाहू नका, पण अशा गोष्टींवर सनसनाटी निर्माण करू नका अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले. भारतीय समाज खूप सुज्ञ आहे, त्यांना काय आवडतं काय आवडत नाही हे ठरवण्यास ते सक्षम आहे असंही सुप्रीम कोर्टाने सुनावलं. आमिरच्या बहुचर्चित पीके सिनेमावर बर्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पण या सिनेमाची खरी चर्चा रंगली ती आमिरच्या न्यूड पोस्टरमुळे. दोन आठवड्यापूर्वी आमिरने आपल्या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रसिद्ध केलं. या पोस्टरमध्ये आमिर नग्न झालाय. वाळवंटात रेल्वे ट्रॅकवर नग्न आमिर हातात ट्रान्झिस्टर घेऊन उभा आहे असं हे पोस्टर आमिरने प्रसिद्ध केलं. आजपर्यंत कोणत्याही बॉलिवूडच्या कलाकाराने असा प्रयोग केला नाही पण मि.परफेक्शनिस्ट म्हणून नाव मिरवणार्या आमिरने असा प्रताप केल्यामुळे काहींनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी स्वागत केलं. अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला पण कोर्टाने याला ‘हिरवा कंदील’ देत आमिरला दिलासा दिलाय. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++