18 ऑक्टोबर : दादरी हत्याकांडाचे देशभरात तीव्र पडसाद उमटले असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र या घटनेचे समर्थन केले आहे. गोहत्या करणारा हा पापी असून वेदामध्येही अशा पापींना ठार मारा असा आदेश दिल्याचं संघाचं मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’मध्ये म्हटलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यमध्ये दादरी हत्याकांडावर भाष्य करण्यात आलं आहे. भारतातील मदरशांमध्ये मुस्लिम तरुणांमध्ये देशाच्या संस्कृतीविषयी व्देषभावना निर्माण केली जाते. दादरीतील अखलाकनेही याच भावनेतून गाईची हत्या केली असावी, याचे प्रायश्चित त्याला मिळाले असे या लेखात म्हटले आहे. गोहत्या करणा-याचे प्राण घ्या असे वेदात म्हटले असून आपल्यासाठी हा जीवनमरणाचा प्रश्न आहे असेही यात नमूद करण्यात आले आहे. एकीकडे भाजपाचे नेते दादरीचा निषेध करत असताना संघाने दादरीचे समर्थन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर भाजपा कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++