06 एप्रिल : नौदलाच्या जहाजांमध्ये आग लागण्याची मालिका सुरुच अजूनही आहे. ‘आयएनएस मातंग’या युद्धनौकेवर आग आज दुपारी तीनच्या मुंबईजवळ सुमारास आग लागली. ऑगस्ट 2013 पासून युद्धनौकांवर होणार्या अपघातांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे नौसेनेच्या डॉकयार्डमध्ये या युद्धनौकेची दुरुस्ती काम सुरू अस्ताना ही आग लागली होती. पण नौकेवर ड्यूटीवर असलेल्या कर्मचार्याच्या लक्षात आल्यावर लगेचंच नौसेनेच्या अग्निशमन विभागाच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणली. या आगीत कुणीही जखमी झाले नसून कोणतंही मोठं नुकसान झालेलं नसल्याची माहिती नौसेनेच्या अधिकार्यांनी दिली आहे. दरम्यान, आगीच्या कारणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहे.