15 ऑक्टोबर : गेली 15 वर्ष मैदानावर आपल्या भेदक बॉलिंगमुळे बॅट्समनला सळो की पळो करून सोडणारं ‘झॅक’ नावाचा झंझावात आता थांबलाय. भारताचा फास्ट बॉलर झहीर खानने निवृत्ती स्वीकारली. सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतलीय. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी यासंबंधीचं ट्वीटही केलंय. कायम दुखापतीमुळे ग्रासलेल्यामुळे आपलं शरीर आता साथ देऊ शकत नाही याची जाणीव झाल्यामुळे आपण निवृत्ती घेत असल्याचं झहीर खानने स्पष्ट केलं.
आगामी सामन्यांसाठी तयारी करत होतो. पण, माझ्या खांद्याला झालेली दुखापत 18 ओव्हरचा भार सहन करू शकत नाही. त्यामुळे मला याची जाणीव झाली आणि आपण निवृत्तीसाठी हीच योग्य वेळ असल्याचं झहीरने प्रांजळपणे कबूल केलं. आयपीएलच्या नव्या हंगामासह आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. भारतासाठी झहीरने 92 टेस्ट, 200 वनडे आणि 17 टी-20 मॅच खेळणार्या 37 वर्षीय झहीर खानचं करिअर दुखापतीमुळे थांबलंय. या दुखापतीमुळे गेल्या 3-4 वर्षांमध्ये टीममध्ये झहीरचं येणं-जाणं सुरू झालं होतं. आयपीएलमध्ये झहीर खान दिल्ली डेयरडेव्हिल्सकडून खेळत आहे. त्याचा करार पुढील वर्षांपर्यंत आहे त्यामुळे झहीर पुढच्या हंगामापर्यंत खेळणार आहे. झहीरने 92 टेस्टमध्ये 311 विकेट घेतल्या आहे. तर पाच दिवसीय टेस्ट क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे (619), कपिल देव (434), हरभजन सिंह (417) यांच्यानंतर सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर ठरलाय. झहीरने 200 वनडेमध्ये 282 तर टी-20 मध्ये 17 विकेट घेतल्या आहे. वर्ल्ड कपमध्ये 21 विकेट घेत झहीरने भरीव कामगिरी केली होती. क्रिकेटपासून दूर होणं हा आपल्यासाठी सर्वात कठीण क्षण असल्याची भावना झहीरने व्यक्त केली. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये सहभागी होतो हीच माझ्या करियरमधली सर्वात मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे असंही झहीर म्हणाला. सचिन तेंडुलकरने दिल्या झहीरला शुभेच्छा… “झहीर सर्वोत्तम पेस बॉलर आहे. झहिरला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा. कायम कूल राहणार्या सर्वोत्तम पेस बॉलरपैकी झहीर एक आहे.तो नवीन आव्हानं स्वीकारण्यासाठी कायम तयार असतो.” झहीरबद्दल थोडक्यात…. 2000 साली क्रिकेटमध्ये पदार्पण डावखुरा फास्ट बॉलर झहीरने 600 हुन अधिक विकेट्स घेतल्यात 2011च्या वर्ल्ड कपमध्ये झहीरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. पण सततच्या दुखापती आणि खालावत चाललेली कामगिरी यामुळे टीममध्ये तो आपलं स्थान टिकवू शकला नाही. गेल्या 18 महिन्यांपासून तो भारतासाठी खेळलेला नाही.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++