08 एप्रिल : आत्महत्या करू नका, त्यापेक्षा तुमच्यावर अन्याय करणार्यांना मारा असा सल्ला देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंच्या या भाषणाची सीडी तपासून त्याविषयी निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय. यवतमाळमध्ये राज ठाकरे यांची भव्य सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या दुखावर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला.
“दुख सगळ्यांना असतं पण त्यावर आत्महत्या हा उपाय नाही. जर आत्महत्या करायच्या असेल तर मारून मरा. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांनी तुमच्यावर अत्याचार केला त्यांना मारून मरा असा सल्ला राज यांनी दिला होता.