13 डिसेंबर : 13 डिसेंबर 2001…..भारतीय संसदेच्या इतिहासातला काळा दिवस…भारतीय लोकशाहीवरचा सर्वात मोठा हल्ला.. वेळ सकाळी 11 वाजून 40 मिनिटं… लाल दिव्यांची एक ऍम्बेसेडर कार संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरली.
कारवर गृहमंत्रालयाचं आणि संसदेचं स्टिकर असल्याने अतिशय कडक सुरक्षेचं कवच भेदून ही कार थेट आत शिरली. मुख्य गेटच्या आतमध्ये शिरल्यावर कारमधल्या एका दहशतवाद्याने हॅण्डग्रेनेडचा स्फोट केला आणि स्वत: उडवून दिलं. इतर दहशतवाद्यांनी एके 47 रायफलमधून अंधाधुंद गोळीबार सुरू केला. तोपर्यंत हा दहशतवादी हल्ला असल्याचे सर्वांच्या लक्षात आलं. अधिवेशन सुरू असल्याने खासदार मंत्री आणि व्हीव्हीआयपी (VVIP) ची संसदेत उपस्थिती होती.
हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी बाहेर पडल्या होत्या. उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्यासह 100 पेक्षा जास्त खासदार सेंट्रल हॉल आणि परिसरात होते. हल्ला करून खासदार आणि मंत्र्यांना ओलीस ठेवण्याची दहशतवाद्यांची योजना होती. सुरक्षा कर्मचार्यांनी प्रसंगावधान दाखवत सेंट्रल भवनाचे दरवाजे बंद केले आणि मोठा अनर्थ टळला.
कारमध्ये असलेल्या 5 कडव्या दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे संसद परिसराला युध्दाचं रूप आलं होतं. सुरक्षा जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत पाचही दहशतवाद्यांना ठार केलं आणि अर्धा तास चालंलेलं हे थरार नाट्य अखेर संपलं. यात 7 जवान शहीद झाले. तर 2 कर्मचार्यांचा गोळीबारात मृत्यू झाला. आता अफझल गुरूच्या फाशीने या शहिदांना खर्या अर्थाने श्रध्दांजली मिळालीय. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++