04 मार्च : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना कॅनडामधून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. कॅनडामध्ये राहणार्या एका अनिवासी भारतीयाने फेसबूकवरून ही धमकी दिलीये. या प्रकरणी कल्याण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, आपण कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, माझं कार्य असंच अविरत सुरू राहिलं असं प्रतिआव्हान अण्णा हजारे यांनी दिलंय.
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर हल्ल्याची घटना ताजी असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडालीये. धक्कादायक म्हणजे कॅनडामधून गगन विधू या अनिवासी भारतीयानेच फेसबूकवरून धमकी दिलीये. अण्णांना याअगोदरही अशा धमक्या देण्यात आल्या आहेत. आताही अण्णांनी या धमकीला घाबरत नसल्याची सडेतोड प्रतिक्रिया दिलीये.
माझं जीवन मी समाजाला समर्पित केलंय. त्यामुळे मी धमक्याना घाबरत नाही, यापुढेही माझं सामाजिक कार्य अविरत सुरुच राहील, असं प्रति आव्हानच अण्णा हजारेंनी केलंय. यापूर्वीही मला अनेकवेळा धमक्या आल्या आहेत. पण, समाज आणि राष्ट्रहितासाठीच मी मरायचं ठरवल्यानं माझं मरण मरुन गेलंय. त्यामुळं मी मरनाला घाबरत नसल्याचंही अण्णांनी म्हटलंय. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या मारेकर्यांना पकडण्यात अपयश आल्यानं समाजकंटकांना भीती वाटत नसल्याचंही अण्णांनी नमूद केलंय. धमकी प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांनाही पत्र देण्यात आलंय.
अण्णांच्या सुरक्षेत वाढ दरम्यान, अण्णांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीये. अण्णांना पूर्वीची झेड सुरक्षा असून त्यामध्ये चार पोलीस वाढवण्यात आले आहेत. अण्णांचं कार्यालय आणि निवासस्थानी मेटल डिटेक्टर बसवण्यात आलीये. त्याचबरोबर तीन वेळा परिसरात तपासणी केली जात आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++