05 फेब्रुवारी : गेले 31 दिवस सुरू असलेला अंगणवाडी सेविकांचा लढा अखेर आज (बुधवारी) अंशत: यशस्वी झालाय. बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांची पेन्शनची मागणी मान्य करण्यात आलीये.
अंगणवाडी सेविकांना आता एलआयसी योजनेद्वारे एकरकमी पेन्शन मिळणार आहे. या पेन्शनमुळे सरकारवर 35 कोटींचा बोजा पडणार आहे. मात्र पुढच्या 15 दिवसांत मानधनवाढीची मागणी मंजूर झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय.
तसंच पुढील 15 दिवसांत अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. या वाढीमुळे सरकारच्या तिजोरीवर 185 कोटींचा बोजा पडणार आहे. मात्र जर 15 दिवसांत मानधन वाढ झाली नाहीतर पुन्हा आंदोलन पुकारणार असा इशारा सेविकांनी दिलाय.